---Advertisement---
जळगाव जिल्हा पाचोरा

Pachora : ट्रक चालकाकडून ५० घेणे भोवले ; तीन वाहतूक पोलिसांवर निलंबनाची कारवाई

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२५ । पाचोऱ्यात ट्रक चालकाकडून पैसे घेतानाचा वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान या घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तातडीने चौकशी करून ट्रक चालकाकडून पैसे घेणाऱ्या पवन पाटील यांच्यासह तिघांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Suspension police

याबाबत असे की, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पाचोरा तालुक्यात वाहतूक पोलीस पवन पाटील यांनी केळी वाहतूक करणारे मालमोटार अडवून चालकाकडे ५०० रुपयांची मागणी केली. परंतु, चालक ५० पेक्षा एक रुपया जास्त देण्यास तयार नव्हता. शेवटी पोलिसाने, आमची इतकीच इज्जत आहे का, असे म्हणत मिळालेले पैसे नाईलाजाने स्वीकारले असल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.

---Advertisement---

पोलिसाला अद्दल घडविण्यासाठीपैसे घेतानाच व्हिडीओ ट्रकच्या कॅबिनवर बसलेल्या व्यक्तीने मोबाईलमध्ये बनवला. ट्रक चालक आणि पोलीस या दोघांमधील संभाषणाची चित्रफीत समाज माध्यमात टाकली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी या घटनेची दखल घेत तातडीने चौकशी करून पवन पाटील यांना निलंबित केले आहे. या घटनेच्या प्राथमिक तपासात पवन पाटील यांनी ट्रकचालकाकडून ५० रुपये घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या व्हिडिओमध्ये आणखी दोन पोलीस कर्मचारीही उपस्थित असल्याने त्यांची भूमिका संशयास्पद आढळून आली आहे. त्यामुळे त्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment