जळगाव लाईव्ह न्यूज । ३ मार्च २०२५ । मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी यात्रेदरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येसह तिच्या मैत्रिणींची काही टवाळखोरांनी छेडछाड केल्याची घटना समोर आली. या घटनेत अटक केलेल्या संशयितांना भुसावळ न्यायालयाने ५ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.

मुक्ताईनगरातील कोथळीत सुरू असलेल्या संत मुक्ताईच्या यात्रेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची शुक्रवारी छेड काढल्याचा प्रकार घडला. टवाळखोरांनी यावेळी सुरक्षा रक्षकालाही धक्काबुक्की केली होती. पोलिसांनी छेडखानी प्रकरणात चार संशयीतांना अटक केली असून यातील एक संशयित हा अल्पवयीन असल्याने बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे
याप्रकरणातील मुख्य संशयित अनिकेत भोई याच्यासह अनुज पाटील व चेतन भोई या तीन संशयतांना आज भुसावळ जिल्हा सत्र न्यायालयात हजार करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संशयितांना ५ मार्चपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली.