---Advertisement---
जळगाव शहर राजकारण विशेष

सुरेशदादांचे एकेकाळचे ‘चाणक्य’ जळगाव महापालिका निवडणुकीत उतरणार?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज | १७ मार्च २०२३ | जळगाव महापालिकेच्या निवडणुका आता जवळ आल्या आहेत. ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२३ मध्ये या निवडणुका होऊ शकतात. शहरातील अनेक ‘भावी नगरसेवक’ गुढघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. राजकीय पक्षांनीही जोरदार तयारी सुरु केली आहे. अशातच एकेकाळचे जळगाव महापालिकेचे ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाणारे प्रदीप रायसोनी महापालिका निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. या शक्यतेचे कारण म्हणजे, त्यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे विचारणा केली आहे. जर प्रदीप रायसोनी या निवडणुकीत उतरल्यास जळगाव महापालिका निवडणुकीतील राजकीय चित्र वेगळे असेल, यात शंका नाही.

pradeep raisoni jpg webp webp

जळगावच्या राजकारणात चाणक्य म्हणून प्रदीप रायसोनी यांचे नाव घेतले जाते. याचं कारण म्हणजे, सुरेशदादा जैन यांनी जळगावच्या राजकारणावर अनेकवर्ष राज्य केलं त्याचं श्रेय प्रदीप रायसोनी यांनाच जाते. जळगाव नगरपालिका आणि महापालिकेच्या कारभारात १९८५ ते थेट २००७ पर्यंत पदाधिकारी म्हणून प्रदीप रायसोनी यांनी ‘उच्चाधिकार समिती’ म्हणून काम केले आहे. नगरपालिका ते महापालिका कार्यकाळात सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. मात्र, कारभाराचे सर्व सूत्रधार रायसोनी होते. सुरेशदादा जैन जळगाव विधानसभा मतदारसंघातून सलग नऊ वेळा निवडून आले. त्यांच्या प्रत्येक निवडणुकीचे नियोजन प्रदीप रायसोनी यांच्याकडूनच होत असे.

---Advertisement---

जळगाव महापालिकेतील घरकुल घोटाळ्यात प्रदीप रायसोनी यांचे नाव पुढे आहे. या प्रकरणात ते तुंरुगातही गेले. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी राजकारणासह समाजकारणापासूनही चार हात लांब राहणे पसंत केले. मात्र आता ते पुन्हा एकदा जळगाव महापालिका राजकारणात सक्रिय होण्याचे संकेत मिळत आहेत. ‘घरकुल’ प्रकरणातील परिस्थितीच्या अनुषंगाने आपण निवडणूक लढवू शकतो काय, अशी विचारणा त्यांनी थेट राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून केली आहे. त्यांच्या या पत्राची दखल घेऊन राज्य निवडणूक आयोगाने जळगाव महापालिकेकडून त्याबाबत घेतली आहे. यास जळगाव महापालिका निवडणूक अधिकार्‍यांनीही दुजोरा देत, राज्य निवडणूक आयोगाने प्रदीप रायसोनी यांनी पाठविलेल्या पत्राच्या अनुषंगाने माहिती विचारली. आम्ही ती माहिती त्यांना दिली असल्याचे सांगितले.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---