जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२१ । भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेच्या (बीएचआर) आर्थिक घोटाळ्यातील संशयित सूरज झंवरला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका बसला आहे. कारण सुरज झंवर याने दाखल केलेल्या रिट पिटीशनसह जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे.
बीएचआर गैरव्यवहार प्रकरणातील संशयित सूरज सुनील झंवर याने मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशनसह जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. यात सरकार पक्षाचे वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी उच्च न्यायालयात युक्तीवाद करतांना सूरज याच्याविरुध्द अनेक पुरावे आहेत. त्याचा गुन्ह्यात सहभाग आहे. सूरज व त्याचे वडिल सुनील झंवर या दोघांचे कार्यालय एकच होते. नावालाच त्यांनी वेगवेगळ्या कंपन्या, फर्म स्थापन केलेल्या असल्याचे सांगितले. यामुळे न्यायालयाने त्याची रिट पिटीशन फेटाळून लावत जामीन अर्ज देखील नाकारला.
न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती मोडक यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर हे कामकाज झाले. सूरजचे वडिल सुनील झंवर याला अटकेपासून १७ मार्चपर्यंत दिलासा मिळालेला आहे.