वाणिज्य

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅपला सुप्रीम कोर्टाचा झटका

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२२ । आज शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकला त्यांच्या नवीन गोपनीयता धोरणाबाबत मोठा दणका दिला आहे. भारतीय स्पर्धा आयोग म्हणजेच CCI व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या नवीन गोपनीयता धोरणाबाबत तपास सुरू ठेवणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. या दोन्ही कंपन्यांनी पॉलिसीच्या वैधतेबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित सुनावणीचा हवाला देत CCI कडून आदेश पारित करण्यावर स्थगिती मागितली होती. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकच्या युक्तिवादावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, CCI ही एक स्वतंत्र संस्था आहे, जर ती स्पर्धा कायद्याच्या उल्लंघनाची चौकशी करत असेल, तर ही चौकशी थांबवता येणार नाही.

फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप या दोन्ही सोशल मीडियाच्या सर्वात मोठ्या कंपन्या आहेत, ज्यांचे सर्वाधिक वापरकर्ते भारतात आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप ही मार्क झुकरबर्गच्या कंपनी मेटाची दोन भिन्न उत्पादने आहेत. फेसबुक आणि व्हॉट्सअ‍ॅप सोबतच इन्स्टाग्राम हे सुद्धा मेटा चे उत्पादन आहे.

भारतात सुमारे 49 कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅप चालवतात
स्टॅटिस्टाच्या आकडेवारीनुसार, जगभरात WhatsApp चे सुमारे 2,44,00,00,000 वापरकर्ते आहेत, त्यापैकी सुमारे 49,00,00,000 वापरकर्ते फक्त भारतात आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतातील WhatsApp वापरकर्त्यांना दररोज अनेक स्पॅम संदेश मिळतात. आपण हे अशा प्रकारे देखील समजू शकता की व्हॉट्सअ‍ॅप हे स्पॅम संदेश प्रसारित करण्याचे भारतातील सर्वात मोठे माध्यम बनले आहे आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे भारतात WhatsApp चे सुमारे 49 कोटी वापरकर्ते आहेत.

LocalCircles च्या अहवालानुसार, देशात WhatsApp चालवणारे सुमारे 95 टक्के वापरकर्ते दररोज स्पॅम संदेश प्राप्त करतात. यामध्येही अनेक यूजर्स आहेत ज्यांना दररोज 1 ते 8 किंवा त्याहून अधिक स्पॅम मेसेज मिळतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button