⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

नवीन बाइक्स खरेदीचा विचार करत असाल तर थांबा? बजाज आणतेय स्वस्त बाइक्स, मायलेजही मिळेल जबरदस्त

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ ऑगस्ट २०२२ । तुम्ही जर स्वस्त आणि चांगली मायलेज देणारी बाईक खरेदी करण्याचा विचार करत असत तर ही बातमी तुमच्या उपयोगी येऊ शकतो. कारण भारतातील लोकप्रिय दुचाकी कंपनी बजाज नवीन बाईक आणणार आहे. हे 125 cc बजाज CT125X असेल. बाईक डीलरशिपवर येण्यास सुरुवात झाली आहे. अशा स्थितीत लवकरच लॉन्च होण्याचे संकेत मिळत आहेत. ही बाईक कमी किमतीत चांगले मायलेज देणार आहे. बाईकचे काही फोटोही ऑनलाइन लीक झाले आहेत. चला तर मंग बाईकच्या इंजिनपासून ते फीचर्स आणि किंमतीपर्यंतची माहिती जाणून घेऊयात.

आगामी बजाज CT125X मध्ये सिंगल पीस सीट, USB चार्जर आणि नवीन ग्राफिक्स मिळतील. बजाज CT125X डीलरशिपवर दिसला आहे. ऑटो ट्रॅव्हल टेक नावाच्या यूट्यूब चॅनलने त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. बाइकचे डिझाइन आणि इंजिन लेआउट अगदी सध्याच्या CT110X प्रमाणे दिसते.

काळ्या आणि लाल शेड्स व्यतिरिक्त, याला नवीन ड्युअल-टोन ग्लॉसी ब्लॅक आणि ग्रीन शेड देखील देण्यात आला आहे. आगामी CT125X ला सध्याच्या CT110X च्या तुलनेत बॉडी पॅनलवर नवीन ग्राफिक्स मिळतात. तथापि, सर्वात मोठे अपडेट म्हणजे सीट डिझाइन आणि हँडलबार क्लॅम्प्सवर बसवलेले USB चार्जर.

सामान्य टायर CT125X मध्ये दिले जाऊ शकतात, तर ड्युअल पर्पज टायर CT110X मध्ये उपलब्ध आहेत. इंजिन डिस्कव्हर 125 कडून घेतलेले दिसते. एकूणच बिल्ड गुणवत्ता चांगली दिसते. बाईकची किंमत जवळपास 80 हजार रुपये असण्याची शक्यता आहे.