⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | कोरोना | कोरोना लसीकरण सक्ती बाबत सुप्रीम कोर्टाचे मोठं भाष्य; वाचा काय म्हणाले न्यायाधिश

कोरोना लसीकरण सक्ती बाबत सुप्रीम कोर्टाचे मोठं भाष्य; वाचा काय म्हणाले न्यायाधिश

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२२ । कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत भारताचे प्रचंड नुकसान झाले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागला. मात्र त्यानंतर लसीकरण महिलेचा वेग झपाट्याने वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला. दरम्यान, कोरोनाविरूद्धच्या लसीकरण मोहिमेबाबत आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आज (सोमवारी)मोठा निर्णय दिला आहे.  एखाद्या वक्तीला कोरोनाची लस घेण्यासाठी बळजबरी केली जाऊ शकत नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे

दरम्यान,  लसीकरण सक्तीचे केले जावे या मागणी करता न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, तुम्ही कोणालाही लसीकरणाची सक्ती करू शकत नाही. कलम 21 प्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा आपल्या शरीरावर अधिकार असतो, त्यामुळे अशी सक्ती करता येणार नाही. असे म्हणत न्यायालयाने ही याचिका देखील फेटाळून लावली आहे.

लसीकरणावर एस.सी
सुप्रीम कोर्टाचे म्हणणे आहे की काही राज्य सरकारे आणि संस्थांनी सार्वजनिक ठिकाणी लसीकरण न केलेल्या लोकांच्या प्रवेशास प्रतिबंध करण्यासाठी लादलेली अट प्रमाणबद्ध नाही आणि सध्याच्या परिस्थितीत ती मागे घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोविड-19 लसीकरणाच्या दुष्परिणामांबद्दलची आकडेवारी सार्वजनिक करण्याचे निर्देशही केंद्राला दिले आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.