⁠ 
गुरूवार, नोव्हेंबर 21, 2024
Home | जळगाव जिल्हा | चाळीसगाव | जनता कर्फ्यूला चाळीसगावकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे ; आ.मंगेश चव्हाण

जनता कर्फ्यूला चाळीसगावकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे ; आ.मंगेश चव्हाण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२१ । कोरोनाच्या दुस-या लाटेत चाळीसगाव तालुका आघाडीवर असून जिल्हाधिका-यांनी शनिवारी व रविवारी जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. दरम्यान, पुकारलेल्या जनता कर्फ्यूला चाळीसगावकरांनी प्रशासनाला सहकार्य करावे. तरच कोरोनाचा प्रार्दूभाव कमी होईल. असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी येथे केले. शुक्रवारी येथील तहसिल कार्यालयात सकाळी ११.३० वाजता झालेल्या प्रशासनाच्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी खासदार उन्मेष पाटील, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, डीवायएसपी कैलास गावडे, तहसिलदार अमोल मोरे, पोनि विजयकुमार ठाकुरवाड, नायब तहसिलदार विशाल सोनवणे उपस्थित होते.

कोरोनाच्या दुस-या लाटेत चाळीसगाव तालुका आघाडीवर असून जिल्हाधिका-यांनी गुरुवारी जनता कर्फ्यूबाबत दिलेले निर्देश लक्षात घेऊनच शुक्रवारी ही बैठक घेण्यात आली. बैठकीत शनिवारी व रविवारी जनता संचारबंदीत कडकडीत बंद पाळण्याबाबत सुचना देण्यात आल्या. सर्व राजकीय पक्ष्यांसह सामाजिक संघटनांनी देखील यात सहभागी होऊन सहकार्य करावे. जनता संचारबंदी यस्वी झाल्यास लॉकडाऊनची समस्या उदभवणार नाही. असेही आमदार खासदार यांनी सागितले.

बैठकीला मुख्याधिकारी विकास नवाळे, उद्योजक वर्धमान धाडीवाल, दिलीप घोरपडे, मुराद पटेल, किराणा असोसिएशनचे जितेंद्र देशमुख, कापड असोसिएशनचे निलेश कटारीया, भाजीपाला असोसिएशनचे बापूसाहेब चौधरी, चाळीसगाव तालुका वृत्तपत्रकार मित्र मंडळाचे अध्यक्ष आर. डी. चौधरी, मेडीकल असोसिएशनचे विनोद जैन, विजय गायकवाड, पोलिस गोपीनिय विभागाचे गणेश पाटील व व्यापारी, पत्रकार उपस्थित होते.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.