जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२६ । अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रीपदाची शपथविधी घेणार आहेत. त्याआधी सुनेत्रा पवार यांनी आपल्या राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

अजित पवार यांच्या धनानंतर त्यांचा राजकीय वारसा पुढे कोण नेणार यांची चर्चा रंगली होती. अखेर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार संध्याकाळी ५ वाजता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्यापूर्वी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पक्षाच्या पुढील रणनीतीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

यावेळी अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर आमदारांनी सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यासाठी समर्थन दिलं. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाली. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहेआता सुनेत्रा पवार या गटनेता असलेल्या अधिकृत पत्र प्रदेशाध्यक्ष या नात्याने सुनील तटकरे आणि अन्य वरिष्ठ नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवणार आहेत.









