⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

विद्यार्थी-पालकांसाठी महत्वाची बातमी ! शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर, कधीपासून लागणार सुट्ट्या?

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ एप्रिल २०२३ । विद्यार्थी आणि पालकांसाठी एका अत्यंत महत्त्वाची आहे. ती म्हणजे राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदाचं 2022-23 या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्र काही दिवसांत संपणार असून त्यानंतर पुढील महिन्याच्या म्हणजेच 2 मे ते 12 जून दरम्यान उन्हाळी सुट्टी असणार आहे. याबाबत शिक्षण संचालक यांनी‎ पत्र काढले आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीचा विद्यार्थी आतुरतेने वाट पाहतात ती म्हणजे उन्हाळी सुट्टीची. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदाच पूर्ण वर्षभर शाळा सुरळीत सुरू राहिल्या. पण कोरोनामुळे मागील 2 वर्ष शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे झाले होते. राज्यात आता शाळा सुरू झाल्या आहेत पण कोरोनामुळे झालेले नुकसान भरुन काढण्याचे आव्हाने शिक्षक आणि शाळेपुढे आहे. याआधी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी उन्हाळी सुट्टी रद्द करुन एप्रिल महिन्यातही पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. पण या बातमीनंतर विद्यार्थ्यांसह पालक ही नाराज होते. त्यानंतर आता 2 मे पासून आता सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, नवीन सत्रात‎ एकूण सुट्या या ७६ पेक्षा अधिक हाेणार नाहीत‎ याची काळजी घेण्याचे सूचित करण्यात आले.‎ राज्यातील इतर सर्व भागात १२ जून रोजी शाळा‎ सुरू होणार आहेत. विदर्भातील तापमान पाहता या‎ ठिकाणी २६ जूनपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय‎ शिक्षण विभागाने घेतला आहे.

तसेच इयत्ता‎ पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचा निकाल १‎ मेपर्यंत लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.‎ शाळांमधून उन्हाळी व दिवाळीची दीर्घ सुटी कमी‎ करून त्या एेवजी गणेशोत्सव व नाताळ सणाच्या‎ प्रसंगी त्या सुटी समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या‎ शिक्षणाधिकारी यांच्या परवानगीने घेण्याचे निर्देश‎ देण्यात आले आहेत.