जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२५ । उन्हाळ्यात रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या चालविल्या जात आहे. यातच पश्चिम रेल्वेने उधना ते सुबेदारगंज दरम्यान उन्हाळी विशेष दोन रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष या गाड्यांना भुसावळ स्थानकावर थांबा असल्याने भुसावळच्या प्रवाशांची सोय झाली आहे.

रेल्वे क्रमांक ०४१५६ उधना-सुबेदारगंज स्पेशल साप्ताहिक रेल्वे ही २२ एप्रिल ते १ जुलैपर्यंत दर मंगळवारी दुपारी ४.३० वाजता उघ्ना येथून सुटेल. भुसावळला रात्री १०.१० वाजता येईल. तसेच रेल्वे क्रमांक ०४९५५ सुबेदारगंज-उघना साप्ताहिक स्पेशल रेल्वे २१ एप्रिल ते ३० जूनपर्यंत दर सोमवारी सकाळी ११.४० वाजता सुबेदारगंज येथून सुटेल आणि मंगळवारी सकाळी ७.५० वाजता भुसावळला येईल. जळगावच्या प्रवाशांना या एक्स्प्रेसने प्रवास करण्यासाठी मात्र भुसावळला जावे लागणार आहे. त्यामुळे जळगाव शहर व परिसरातील प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरणार असल्याचे समोर येते.
या स्थानकांवर असेल थांबा?
ही ट्रेन चलठण, नंदुरबार, अमळनेर, भुसावळ, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओराई, पुखरायण, गोविंदपुरी आणि फतेहपूर स्थानकावर दोन्ही दिशेने थांबेल. या ट्रेनमध्ये एसी ३-टायर, स्लीपर क्लास आणि जनरल सेकंड क्लास कोच असतील.