---Advertisement---
पारोळा गुन्हे

भोकरबारी येथील तरुणाची आत्महत्या

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२१ । पारोळा तालुक्यातील भोकरबारी ३० वर्षीय तरुणाने काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना २२ रोजी रात्री घडली. दीपक नगराज पाटील (वय ३०) असे या मृत तरुणाचे नाव असून याबाबत पाराेळा पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नाेंद करण्यात आली आहे.

dipak nagraj patil jpg webp

भाेकरबारी येथील दीपक पाटील हे २२ राेजी रात्री ९ वाजता घरात झाेपले हाेते. दरम्यान, दीपक पाटील यांचे बंधू अजय पाटील हे कामावरुन घरी परतले. अजय यांनी दीपक यांना उठवण्याचा प्रयत्न केला मात्र ते उठले नाहीत म्हणून अजय पाटील यांना शंका अाली. तर दीपक पाटील यांच्या ताेंडातून अजय यांन उग्र वास येत असल्याचे लक्षात आले.

---Advertisement---

त्यानंतर अजय यांनी तत्काळ शेजारी राहणाऱ्या किशोर महादु पाटील, किरण हिंमत पाटील, सागर संजय पाटील यांना ही माहिती दिली. त्यानंतर या सर्वांनी दीपक पाटील यांना खासगी वाहनाने पाराेळा येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी रात्री १० वाजता दाखल केले. डाॅक्टारांनी तपासणी केल्यानंतर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास दीपक पाटील यांना मृत घाेषीत केले. या प्रकरणी अजय पाटील यांच्या माहितीवरुन पाराेळा पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नाेंद करण्यात अाली आहे. या घटनेचा तपास हेड काॅन्स्टेबल विनाेद साळी करत आहेत.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---