जळगाव लाईव्ह न्यूज । १३ ऑक्टोबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे खुर्द येथील परशुराम सुदाम देसले(पिंन्टु तात्या वय 45) या तरुण शेतकऱ्याने काल दि.12 मंगळवार रोजी दुपारच्या सुमारास शेतात विष प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. शेतीव्यवसायातील कर्जबाजारीपणामुळे आणि अतिव्रुष्टीमुळे ते आर्थिकदृष्ट्या सतत ताणतणावात होते.ते संगतीप्रिय,अजातशत्रु,मीतभाषी,शांत आणि प्रेमळ स्वभावाचे होते आपल्या उभ्या जीवनात ते एक चांगले सामाजिक कार्यकर्ते म्हणुन तालुक्यात परिचीत होते.
स्व. पिंन्टु तात्या म्हणुन सर्वजण त्यांना संबोधत त्यांचा मित्रपरिवार चाळीसगांव तालुक्यात फार मोठा होता. त्यांच्या आकस्मीत निधनाने सर्वदुर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. ते राजेंन्द्र सुदाम देसले -पाटील, तांबोळे बु।। ग्रामपंचायत सदस्य, वि. का .सोसायटी तांबोळे बु।। सदस्य, व एल. आय सी. अधिकारी धुळे यांचे लहान बंधु होते. पुढील माहिती अद्याप प्राप्त नाही.