⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

ऑन ड्यूटी असताना पारिचारिकेने घेतला टोकाचा निर्णय, जळगावातील घटना..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२३ । जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौकातील अथर्व रुग्णालयात काम करणाऱ्या २१ वर्षीय पारिचारिकेने ऑन ड्यूटी असतानाच टोकाचं पाऊल उचललं आहे. पारिचारिकेने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली आहे. अकिना शाजी (वय-२१ वर्ष, रा. इकाड, राज्य केरळ ह. मु. अथर्व हॉस्पिटल, स्वातंत्र्य चौक, जळगाव) असे गळफास घेतलेल्या तरूणीचे नाव असून याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील अथर्व हॉस्पिटल येथे गेल्या काही महिन्यांपासून अकिना शाजी ही तिची मोठी बहीण अगीलू शाजी हिच्यासोबत राहत होती. दोन्ही बहिणी एकत्रच हॉस्पिटलमधील रूममध्ये वास्तव्याला व त्याच ठिकाणी एकचत्र नोकरी करत होत्या. दरम्यान, शनिवारी अकिना हिची रात्र पाळी ड्यूटी होती. त्यावेळी तिची मोठी बहिण अगीलू हिची ड्यूटी संपल्याने ती रूमवर निघून गेली होती.

मध्यरात्री अकिनाने हॉस्पिटलमध्येच कामावर असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यांनंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास अकीना हिने फोनवरुन तिच्या कुटुंबियांशी संवाद साधला होता, सर्व काही व्यवस्थित आहे का? अशी विचारणा सुद्धा केली, व त्यानंतर काही तासांनी तिने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.