⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | पत्नी माहेरी, घरी पतीने उचललं टोकाचं पाऊल, जळगावातील धक्कादायक घटना

पत्नी माहेरी, घरी पतीने उचललं टोकाचं पाऊल, जळगावातील धक्कादायक घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२२ । जिल्ह्यात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच जळगाव एका विवाहित तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नी व मुलगी माहेर गेलेली असताना घरी पतीने आत्महत्या केल्याची घटना जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील पंढरपूर नगरात घडली. प्रवीण उर्फ सागर दिनकर साठे (वय ३२) असं मृत तरुणाचं नाव असून आत्महत्येमागचे नेमकं कारण कळू शकले नाही.

प्रवीण साठे हा धरणगाव तालुक्यातील रोटवद या गावातील मूळ रहिवाशी आहे. तो पत्नी व मुलीसह जळगाव शहरातील एमआयडीसी पसिरातील पंढरपूर नगरात वास्तव्यास होता. तो चटई कंपनीत कामाला होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्याची पत्नी ही मुलीला सोबत घेऊन तिच्या माहेरी गेली होती. मंगळवारी प्रवीण कामावर गेला नव्हता, तर दुसरीकडे त्याची पत्नी कविता ही त्याला मोबाईलवर संपर्क साधत होती. मात्र तो फोन उचलत नव्हता, तसंच कुठलाही प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे कविता हिने शहरातील रामेश्वर कॉलनी येथील पती प्रवीण याच्या चुलत मामाला मोबाईलवरुन संपर्क साधला. तसंच घरी जाऊन प्रवीणची माहिती घेण्यास सांगितले.

कविता हिने सांगितल्यानुसार प्रवीणचे चुलत मामा समाधान महाजन यांनी घरी जाऊन पाहणी केली असता, घरी प्रवीण हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. समाधान महाजन यांनी या प्रकरणाची माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश शिरसाळे हे करत आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.