जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२१ । एका शाळकरी अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना यावल तालुक्यातील नायगाव येथे घडलीय. सुजल रमण तडवी (वय १६) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत यावल पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
सुजल तडवी या अल्पवयीन मुलाने शुक्रवारी दुपारी गुरांच्या गोठ्यात पत्रांच्या शेडच्या अँगलला दोरी बांधुन गळफास घेतला. या घटनेची खबर मयताचे वडील रमण रूबाब तडवी (वय ४३ वर्ष) यांनी दिल्याने पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली.
पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक जितेंद्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहे. सुजल तडवी याच्या मृतदेहाचे यावलच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुजलने आत्महत्याका केली हे लगेच समजू शकले नाही. रागाच्या भरात त्यांने हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज आहे.