⁠ 
शनिवार, जुलै 27, 2024

दुर्दैवी! भरधाव डंपरने घेतला चार वर्षीय चिमुकलीचा जीव ; जळगावातील घटना..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ ऑगस्ट २०२३ । जळगाव शहरासह जिल्ह्यात सुसाट धावणाऱ्या डंपरांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तरी डंपर चालकांना अद्दल घडविली जात नाहीय. याच दरम्यान, आता भरधाव डंपरने स्कूटीला जोरदार धडक दिली. यात चार वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. प्रेरणा योगेश नेमाडे (वय-४) रा. माऊल नगर, जळगाव असे मृत चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

नेमकी काय आहे घटना?
जळगाव शहरातील माऊली नगरात योगेश नेमाडे हे आपल्या पत्नी दक्षता, मुलगी प्रेरणा आणि मुलासह वास्तव्याला आहेत. त्यांची चार वर्षाची मुलगी प्रेरणा ही जळगाव पब्लिक स्कूलमध्ये नर्सरी वर्गात शिकत आहे. नेहमीप्रमाणे प्रेरणाची शाळा सुटल्यानंतर तिची आई दक्षता या स्कूटी (एमएच १२ ईडब्ल्यू ८८२९) घेण्यासाठी गेल्या होत्या.मुलगी प्रेरणाला स्कूटीने घरी घेवून जात असतांना राष्ट्रीय महामार्गावारील हॉटेल तनय जवळ भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर (एमएच १९ सीवाय ६७६९) ने जोरदार धडक दिली.

या दुर्घटनेत प्रेरणा ही गंभीर जखमी झाली. तिला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी मयत घोषीत केले. दरम्यान, डंपर चालक डंपर सोडून पसार झाला होता. एमआयडीसी पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पुढील कारवाई करण्यात येत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीस ठाण्यात कारवाई करण्याचे काम सुरू होते.