---Advertisement---
गुन्हे भुसावळ

मोठी बातमी! सुनसगाव जवळील पेपर मिलला भीषण आग, कोट्यवधींच्या नुकसानीची भीती

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मे २०२३ । आगीची एक मोठी घटना समोर आलीय. भुसावळ तालुक्यातील सुनसगाव जवळील सुदर्शन पेपर मिलला भीषण आग लागल्याची घटना आज रविवारी सकाळी उघडकीस आली. या आगीमुळे कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, घटनास्थळी भुसावळसह जिल्ह्यातील अन्य पालिकांचे बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले आहेत.

sudarshan paper got fire jpg webp webp

सुनसगाव जवळील सुदर्शन पेपर मिल ही पेपर बनवण्यासाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या मिलमध्ये आज सकाळी आग लागली. एक-एक करीत आगीचा विळखा अनेक विभागांपर्यंत पोहोचला असून या आगीमुळे कोट्यवधी रुपयांची हानी झाल्याची भीती आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून आग विझवण्यासाठी अग्निशमन दलालाल पाचारण करण्यात आले

---Advertisement---

घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्यासह तालुका पोलिसांनी धाव घेतली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत आगीचे कारण व नुकसानीचा आकडा समारे येणार आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---