डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात पेल्वीक युरेटरीक जंक्शन अडथळ्यावर यशस्वी उपचार

डिसेंबर 31, 2025 4:54 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अत्याधुनिक लेप्रोस्कोपिक पायलोप्लास्टी शस्त्रक्रियेच्या माध्यमातून ४८ वर्षीय महिला रुग्णाच्या पेल्वी-युरेटरिक जंक्शन (झणग) अडथळ्याचा यशस्वी उपचार करण्यात आला.

pelvic ureteric junction

सदर रुग्ण कंबरेतील सतत दुखणे, वारंवार पोटदुखी आणि मळमळ यांसारख्या तक्रारींसह वैद्यकीय तपासणीसाठी दाखल झाली होती.यावेळी सखोल वैद्यकीय तपासणी आणि रेडिओलॉजिकल चाचण्यांनंतर तज्ञांनी पेल्वी-युरेटरिक जंक्शन अडथळ्याचे निश्चित निदान केले आणि पोटात लहान चिरे करून लेप्रोस्कोप (कॅमेरा असलेला डिव्हाइस) आणि सूक्ष्म शस्त्रक्रियात्मक साधने वापरत.

Advertisements

अरुंद झालेला भाग काढून टाकून मूत्र प्रवाह पुनर्संचयित केला, ज्यामुळे किडनीतील दाब कमी होउन नैसर्गिक मूत्र वाहिन्याचा मार्ग पुन्हा सुरू झाला. म्हणूनच किमान आक्रमक लेप्रोस्कोपिक पायलोप्लास्टी हा उपचार सर्वोत्तम ठरेल असा निर्णय घेतला आणी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि रुग्णाच्या प्रकृतीत लगेचच लक्षणीय सुधारणा दिसून आली. रुग्णाला कोणत्याही गंभीर गुंतागुंतीचा सामना करावा लागला नाही व त्याचे रक्तप्रवाह आणि किडनीचे कार्य निरोगी स्थितीत आहे.

Advertisements

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील तज्ञांनी नमूद केले की, या यशस्वी उपचारामुळे रुग्णालयाची प्रगत व किमान आक्रमक शस्त्रक्रिया उपचार केंद्र म्हणून प्रतिमा अधिक दृढ झाली आहे आणि या प्रकारच्या दुर्मिळ व गुंतागुंतीच्या आजारांवर तज्ज्ञ उपचार देण्याची बांधिलकी अधोरेखित होते.या शस्त्रक्रियेमध्ये डॉ. मिलिंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली,डॉ. शुभम चौधरी,डॉ. श्रीकांत रेड्डी,डॉ. सहार अब्दुल्ला हमडुले,डॉ. शार्दूल कांबळे,डॉ. अवेस गोडिल,एनेस्थेसिया विभाग:डॉ. शीतल,डॉ. मारिया फर्नांडीस,या वैद्यकिय तज्ञांनी सहभाग घेतला:

(झणग) पेल्वी-युरेटरिक जंक्शन अडथळा म्हणजे किडनीतील मूत्र युरेटरकडे जाणार्‍या भागात अडथळा निर्माण होणे, ज्यामुळे मूत्राचा प्रवाह अडथळ्यामुळे थांबतो आणि किडनी सुजते (हायड्रोनेफ्रोसिस) असे होते. ही अवस्था प्रामुख्याने लहान मुलांमध्ये दिसत असली तरी पण प्रौढांमध्येही दिसू शकते आणि अनेकदा निदान उशिरा होते कारण लक्षणे अस्पष्ट असू शकतात.
डॉ. सेहर अब्दुल्ला हमडुले निवासी वैद्यकिय अधिकारी

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now