⁠ 
रविवार, नोव्हेंबर 24, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | जीएमसीत कर्करोगांवर यशस्वी शस्त्रक्रिया

जीएमसीत कर्करोगांवर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज | २५ एप्रिल २०२२। येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आतड्याच्या आणि छातीचा कर्करोगाच्या दोन महिला रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले.

शहरातील वाघ नगर येथील रहिवासी इंदुबाई उखा सोनवणे (वय ५६) हिला बवासीर हा त्रास होता. पोटात दुखणे व शौचास जाण्यास अडचण येत होती. विविध रुग्णालयात त्यांच्या तपासण्या झाल्या. तेथे योग्य उपचार न झाल्याने त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. महिलेला कर्करोगाची शक्यता तपासून तपासणी केले असता, तिला खालच्या आतड्याचा कर्करोग असल्याचे निदान दिसून आले. त्यानुसार महिलेवर शस्त्रक्रिया करून तिला दिलासा देण्यात आला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने महिलेला महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळवून देण्यात आला.
दुसऱ्या प्रकरणात, शोभा शोभराम कोळी (वय ४२, रा. साई नगर, जळगाव) ह्या सहा महिन्यांपासून डाव्या स्तनाच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांना सुरुवातीला केमोथेरपी देण्यात आल्या होत्या. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे डाव्या स्तनाची कर्करोगाची शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी विकृतीशास्त्र विभागात एफएनएसी तसेच सिटी स्कॅन, सोनोग्राफी करण्यात आली. त्यांनी रुग्णालयात १७ दिवस यशस्वी उपचार घेतल्यानंतर गुरुवार २१ एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयातून निरोप देण्यात आला.

दोन्ही रुग्णांवर शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. मारोती पोटे, डॉ. संगीता गावित यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रशांत देवरे, डॉ. मिलिंद चौधरी, डॉ. समीर चौधरी, डॉ. शंतनू देशपांडे, डॉ. विपीन खडसे, डॉ. प्रज्ञा सोनवणे यांनी उपचार केले.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.