दृष्टी वाचवण्यात डॉ. उल्हास पाटील रूग्णालयातील नेत्रतज्ज्ञांना यश
जळगाव लाईव्ह न्यूज । घरात खेळत असताना झालेल्या अपघातात १५ वर्षीय बालिकेच्या डोळ्याला गंभीर मार लागला. या मारामुळे डोळ्यातील बुबुळाचा पडदा (कॉर्निया) फाटून डोळ्यात मोतीबिंदू तयार झाला. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रूग्णालयातील नेत्रतज्ज्ञांच्या टीमने केलेल्या तातडीच्या शस्त्रक्रियेमुळे बालिकेची दृष्टी वाचली.

याबाबत माहिती अशी की, भुसावळ येथील पूजा जाधव नामक १५ वर्षीय बालिकेच्या डोळ्याला काठीचा फटका लागला होता. त्यामुळे तिच्या डोळ्यातील बुबुळाचा पडदा फाटून डोळ्यात मोतीबिंदू तयार झाला. अचानक दृष्टी धूसर होणे, वेदना व डोळ्यातून पाणी येणे अशी लक्षणे दिसू लागल्यानंतर कुटुंबीयांनी तातडीने बालिकेला जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले.रूग्णालयात विभागप्रमुख डॉ. एन.एस. आर्विकर, डॉ. रेणुका पाटील, डॉ. मयूरी निलावाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. उर्मी गायकवाड यांनी बालिकेची सखोल तपासणी केली असता बालिकेला कॉर्नियल टियर हा गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. डोळ्याच्या पुढील पारदर्शक पडद्याला (कॉर्निया) झालेली फट ही दृष्टीसाठी अत्यंत धोकादायक असते. वेळेत उपचार न झाल्यास कायमस्वरूपी दृष्टी जाण्याची शयता असल्याने डॉटरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.

तपासणीनंतर नेत्रतज्ज्ञांनी पालकांना आजाराची तीव्रता समजावून सांगत त्वरित शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व अनुभवी तज्ज्ञांच्या माध्यमातून ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान फाटलेला कॉर्निया दुरुस्त करण्यात आला. तसेच मारामुळे तयार झालेला मोतीबिंदू काढण्यात आला. संपूर्ण शस्त्रक्रिया अत्यंत काळजीपूर्वक पार पाडण्यात आली.विशेष बाब म्हणजे ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सामान्य कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला. शस्त्रक्रियेनंतर बालिकेची प्रकृती समाधानकारक राहिली. उपचारानंतर दुसर्याच दिवशी डॉटरांनी तपासणी करून बालिकेला रूग्णालयातून सुटी दिली.
पालकांना आवाहन
या घटनेमुळे पालकांनीही इतरांना आवाहन केले आहे की, मुलांच्या खेळताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी आणि डोळ्याला कोणतीही इजा झाल्यास विलंब न करता तज्ज्ञ डॉटरांकडे उपचार घ्यावेत. वेळेवर केलेल्या उपचारामुळे एका १५ वर्षीय बालिकेची दृष्टी वाचली असून तिच्या आयुष्यात पुन्हा उजेड परतला आहे.
डोळ्याला झालेली कोणतीही दुखापत हलयात घेऊ नये. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत डोळ्याला मार लागल्यास त्वरित नेत्रतज्ज्ञांकडे तपासणी करणे अत्यंत गरजेचे असते. कॉर्नियल टियरसारखा आजार वेळेत ओळखून उपचार केल्यास दृष्टी वाचवता येते. उशीर झाल्यास कायमस्वरूपी नुकसान होऊ शकते.
- डॉ. उर्मी गायकवाड,
निवासी, डॉ. उल्हास पाटील रूग्णालय.





