जळगाव जिल्हाजळगाव शहर

जायंटसेल ट्यूमरची ४२ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२२ । गेल्या अनेक दिवसांपासून गुडघ्यात सूज असल्याकारणाने गुडघेदुखीच्या समस्येने महिला त्रस्त होती, काही तपासण्यांवरुन तज्ञांनी लक्षात आले की, हा हाडांचा ट्यूमर असून ‘त्या’ ४२ वर्षीय रुग्ण महिलेवर जायंटसेल ट्यूमर (ॠळरपीं उशश्ररी) साठी शस्त्रक्रिया करण्यात आली.

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील अस्थिरोग विभागप्रमुख डॉ.दिपक अग्रवाल यांच्या ओपीडीत एक रुग्ण गुडघेदुखीची समस्येने त्रस्त होवून आली होती. सर्वप्रथम रुग्णाची हिस्ट्री जाणून घेतली असता रुग्ण महिला पडली किंवा काही मार लागला असे काहीही नव्हते, तरीसुद्धा वेदना तीव्र होत्या, दरम्यान प्राथमिक तपासणी डॉक्टरांनी केली त्यानंतर एक्स रे काढून येण्याचा सल्ला दिला. यात रुग्णाच्या उजव्या गुडघ्यात सुज आणि तेथील हाड तुटलेले असल्याचे निर्दशनास आले. थोडी सखोल तपासणी केली असता तो हाडांचा ट्यूमर असल्याचेही निष्पन्न झाले. त्यावर शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय होता. जर या शस्त्रक्रियेसाठी आणखी उशिर केला गेला तर तो छातीत पसरण्याची दाट शक्यता असते, याबाबत नातेवाईकांचे समुपदेशनही डॉक्टरांनी केले. नातेवाईकांनाही ते पटले आणि त्यांनी तात्काळ शस्त्रक्रियेस संमती दिली. यावेळी अस्थिरोग तज्ञ डॉ.दिपक अग्रवाल यांनी जायंटसेल ट्यूमरची शस्त्रक्रिया केली, त्यांना भुलतज्ञांसमवेत ऑर्थोपेडीक रेसिडेंट डॉ.परिक्षीत पाटील आदिंचे सहकार्य लाभले.

लिंबूच्या आकाराची भलीमोठी गाठ

या शस्त्रक्रियेत रुग्णाच्या गुडघ्याच्याजागी मोठ्या लिंबूच्या आकारातील गाठ अर्थात ट्यूमर काढण्यात आला आणि रुग्णाच्या कमरेतून एक हाड काढून गुडघ्याच्याजागी त्याचे प्रत्यारोपण करण्यात तज्ञांना यश आले. आगामी पाच वर्षात जायंटसेल ट्यूमरचा फैलाव होण्याची शक्यता असते, त्यामुळे नियमित तपासणी करण्याचा सल्लाही डॉक्टरांनी यावेळी दिला.

Related Articles

Back to top button