जळगाव जिल्हा

वनक्षेत्रास लागून असलेल्या शेतजमीन धारक शेतकऱ्यांना सौर ऊर्जा कुंपणासाठी अनुदान उपलब्ध करावे – खा. उन्मेश पाटील

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज । २८ मे २०२२ । जिल्ह्यातील वनक्षेत्रास लागून असलेल्या शेती क्षेत्राचे वन्यप्राणी (उदा.नीलगाय, हरिण, रान डुक्कर इ.प्राणी) मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून याबाबत मतदार संघातील भेटीवेळी शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत आहेत. ही समस्या नेहमी वनक्षेत्राला लागून असलेल्या शेतकऱ्यासाठी वेळोवेळी अडचणीची ठरते. यासाठी जळगाव लोकसभा मतदार संघातील वनक्षेत्राला लागून असलेले गावांमधील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे शेती पिकाचे होत असलेले नुकसान टाळण्याकरिता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सौर ऊर्जा कुंपण योजने अंतर्गत अनुदान उपलब्ध होण्याकरिता तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावा जेणेकरून वन्यप्राण्यांमुळे शेती पिकाचे होणारे नुकसान कमी करण्यास मदत होईल. अशी आग्रही मागणी खासदार उन्मेश पाटील यांनी शासनाकडे केली आहे.


जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की सात्तत्याने माझ्या जळगाव लोकसभा मतदार संघातील वनक्षेत्राला लागून असलेले गावांमधील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांमुळे शेती पिकाचे होत असलेले नुकसान टाळण्याकरिता डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सौर ऊर्जा कुंपण योजने अंतर्गत अनुदान उपलब्ध होण्याकरिता तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावा जेणेकरून वन्यप्राण्यांमुळे शेती पिकाचे होणारे नुकसान कमी करण्यास मदत होईल.तसेच मानवी वस्त्यांमध्ये गुरे व पाळीव प्राण्यांवर वन्यप्राण्यांचे हल्ले रोखण्यास देखील मदत होईल. या पत्राद्वारे मी आशा बाळगतो की आपण तात्काळ संबधित पत्रावर कार्यवाही करून प्रस्ताव सादर कराल. तसा अहवाल माझ्या कार्यालयास पाठवाल. अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली असून या आशयाच्या निवेदनाच्या प्रती मा. उपवनसंरक्षक जळगाव यांना माहिती व पुढील कार्यवाहीस्तव सादर करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button