गुन्हेजळगाव जिल्हा

एटीएम मधुन पैसे काढतांना अडकले : पैसे परत न मिळाल्याने आरबीआय कडे तक्रार

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२२ । तालुक्यातील दहीगाव येथील एक इसम गावातील भारतिय स्टेट बँकेच्या एटीएम मधुन दहा हजार रूपये काढण्यात गेला होता व संपुर्ण प्रक्रीया पुर्ण केल्यावर हातात पैसे पडतील तितक्यात एटीएम मधीन बंद पडले व पैसे मिळाले नाही काही वेळ इसम थांबला मात्र, पैसे आले नाही आणी त्यांच्यास युको बँक खात्यातुन पैसे वजा झाले. तेव्हा पासुन गेल्या दिड महिने झाले इसम दोन्ही बँकांची पायपिट करत असुन त्यांना पैसे मिळाले नाही यात दिवाळी देखील अंधारात गेली. तेव्हा सदर इसमाने आरबीआय कडे या बाबत तक्रार केली आहे
.
दहिगाव ता. यावल येथील रहिवासी रामकृष्ण अरूण जावळे याचे कोरपावली येथील यूको बँकेत खाते आहे. या खात्याच्या एटीएम कार्ड व्दारे दिनांक २० सप्टेंबर रोजी दुपारी १.३० वाजेला ते पैसे काढण्याकरीता दहिगाव येथील भारतिय स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये गेले व १० हजार रूपये काढण्याची प्रक्रीया पुर्ण केली पैसे बाहेर येतील तत्पूर्वीच मशीन बंद झाली आणि त्यांचे पैसे त्यांच्या हाती मिळाले नाही. तेव्हा काही वेळ थांबले यात त्यांच्या यूको बॅक खात्यातुन १० हजार रूपये वजा झाले होते. तेव्हा पैसे कपात झाले मात्र मिळाले नाही म्हणुन त्यांनी यावल शहरातील स्टेट बँक गाठली व तोंडी तक्रार केली मात्र त्यांचे खाते यूको बँक कोरपावली येथे असल्याने त्यांना तिथे तक्रार देण्याचे सांगितण्यात आले त्यांनी दिनांक २६ सप्टेंबर रोजी यूको बँकेत लेखी तक्रार केली मात्र, गेल्या दिड महिन्या पासुन जावळे हे दोन्ही बँकेत पायपिट करीत आहे तरी त्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीये.तेव्हा कंटाळून जावळे यांनी आता या बाबत आरबीआय कडे या संदर्भात तक्रार नोंदवली आहे.

५९० रूपये लागतील.
यूको बॅंके कडे जेव्हा जावळे या बाबत तक्रार केली तेव्हा त्यांना तुम्हाला ५९० रूपये चार्ज लागेल असे सांगीतले तर स्टेट बँकेने यूको बँकेकडून स्वत:हाचं तक्रार मांगवली मात्र अद्या पैसे गेले तरी कुठे याचा शोध लागत नाहीये.

दिवाळी आंधारात
सप्टेंबर मध्ये घडलेल्या या प्रकारा बाबत ऑक्टोंबर मध्ये असलेल्या दिवाळी पर्यंत पैसे मिळतील म्हणुन सातत्याने कोरपावली व यावल अशी पायपिट केली मात्र, एटीएम मधून पैसे गेले कुठे त्याचा शोध दोन्ही बँकांकडून लावता आला नाही व दिवाळी अंधरात गेली.असे प्रसंगी रामकृष्ण अरूण जावळे यांनी सांगीतले.

यूको बँक कडून योग्य पाठपुरावा नाही.
सदर ग्राहक हा स्टेट बँकेच्या एटीएमवरून पैसे काढण्यास आला व ते त्या एटीएमची संपुर्ण सीसीटीव्हीचे पुटेज आम्ही मांगवले आहे तसेच खातेधारक हा यूको बँकेचा असुन वेळीचं यूको बँक कडून योग्य पाठपुरावा झाला असता तर ही समस्या कधीची सुटली असती. आम्ही आपच्या स्तरावर योग्य कार्यवाही करीत आहोत.
विजय टाले, व्यवस्थापक, भारतिय स्टेट बँक शाखा यावल.-पुर्ण-

Related Articles

Back to top button