---Advertisement---
बातम्या

महापौरांच्या घरावर दगडफेक : ४३ जणांवर दंगली सह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२२ । जळगाव जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना रात्री ११ वाजता मात्र जळगाव शहरात एक अनुचित प्रकार घडला. मेहरुण परिसरातील महापौर जयश्री महाजन व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांच्या निवासस्थानावर एका सार्वजनिक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विसर्जन मिरवणुकीदरम्यान जळते फटाके, गुलाल, व दगडाची फेक केली. परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अठरा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

जळगाव जिल्ह्यात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडत असताना मेहरून परिसरात गालबोट लावणारी घटना घडली. एका मंडळाचे कार्यकर्ते महापौर जयश्री महाजन यांच्या घराजवळ आले असता त्यांनी खूप मोठ्याप्रमाणात गुलाल महापौरांच्या घरावर फेकण्यास सुरुवात केली. काही वेळाने पेटते सुतळी बॉम्ब आणि दगड देखील फेकण्यात आले. घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. त्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेश मूर्ती जागेवर सोडून पळ काढला.

यासंदर्भात ४३ जणांच्या विरोधात दंगली सह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून यातील १८ जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत,

शिवसेना एकवटली
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, महापालिका सभागृह नेते ललित कोल्हे, गजानन मालपुरे, सरिता कोल्हे, मानसिंग सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत महापौर महाजन यांची भेट घेतली.

sunil mahajan and jayashtri mahajan jpg webp

तर अधिकार्‍यांनी राजीनामे द्यावेत – महापौर
मेहरुण परिसर अतिशय संवेदनशील असतानाही तिथे एकही पोलीस कर्मचारी नव्हता, तसेच घटना घडल्यानंतर तेथे दोन पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्यांनी पाहिणी केली. मात्र, त्यानंतरही त्यांनी ही घटना वरिष्ठांना कळविली नाही, असा आरोप महापौर महाजन यांनी केला आहे. शहराच्या प्रथम नागरिकांच्या घरावर हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्‍न करीत जळगावातील कायदा व सुव्यवस्था संपली असून, पोलिसांकडून परिस्थिती हाताळली जात नसेल तर अधिकार्‍यांनी राजीनामे द्यावेत, अशी संतप्त प्रतिक्रिया महापौर जयश्री महाजन यांनी दिली.

---Advertisement---

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---