‘गोद्री कुंभ’ला अद्यापही भेट दिली नाहीय? तर तुम्ही हि गोष्ट ‘मिस’ करत आहात

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जानेवारी २०२३ । हिंदू गोर बंजारा – लबाना -नायकडा समाज कुंभाला जामनेर येथील गोद्री या गावात मोठ्या दणक्यात सुरुवात झाली. २ दिवस जवळ जवळ ३० हजार भाविकांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या ठिकाणी भेट दिली. मात्र जर तुम्ही याठिकाणी अजून भेट दिली नसेल तर तुम्ही खूप मोठी गोष्ट ‘मिस’ करत आहेत.आणि या गोष्टीसाठी तुम्ही याठिकाणी जायलाच हवं. ती गोष्ट म्हणजे तिथले प्रदर्शन. (godri kumbha)

श्री संत सेवालाल महाराज सभागृहाच्या बाजूला बंजारा समाजाचे ऐतिहासिक प्रदर्शन लावण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने बजारा समाजाचा उगम, समाजातील महान संत तसेच सिंधू, हडप्पा संस्कृती पासूनचा इतिहास, ते वापरत असलेल्या वस्तू, समाजाचा पराक्रम या गोष्टींना प्रदर्शनातं दाखवण्यात आले आहे.

गोर बंजारा समाज वापरत असलेल्या दाग-दागिने व आभूषण यांचेही विविध धातूतील वस्तू प्रदर्शनात मांडण्यात आल्या आहेत. त्यात बंजारा समाजातीत महिला वापरत असलेले विविध प्रकारचे आभूषण आभूषणांचे वेगळेपण त्याठिकाणी दिसून येते.

बंजारा समाज रोजच्या संसारासाठी काय प्रकारचे साहित्य वापरायचा? हे तिथे सांगण्यात आले आहे. म्हणजेच काय तर समाजाचा संपूर्ण इतिहास या ठिकाणी मांडण्यात आला आहे. गोर बंजारा समाजाचे कुळ आणि गोत्राचे स्पष्टीकरण या प्रदर्शनात आपण पाहू शकतो.

समाजची वेशभूषा कशी होती? घाटीतील गोर बंजारा समाजातील सामाजिक व्यवस्था रितीरिवाज, तांडा निवास पद्धत, घाटी परंपरा धर्म, वेश भूषा, भाषा आदींचा उहापोह याठिकाणी करण्यात आला आहे.

गोर बंजारा तांडा संस्कृतीचा उदय व्यापार व्यवस्थेतून झाल्याचे याठिकाणी आल्यावरच समजते. पूर्वीच्याकाळी समाजातील लोक तांड्यावर राहत असत. त्यांच्यासोबत बैलगाडी आणि जनावरांच्या माध्यमातून ते व्यापार करत असत. तांडयाच्या सुरक्षेसाठी एक सशरण सेना कार्यरत होती. असेही प्रदर्शनातून समजते.

नृत्य संगीत हा बंजारा समाजाचा सर्वात महत्वाचा घटक आहे. नृत्य आणि संगीता शिवाय समाजाचा कोणताही कार्यक्रम होणं शक्य नाही. हे आपण आताही पाहतो. महिलांचे नृत्य गोल आकार पद्धतीने एका तातावर केले जाते. डफ डफ वाजणारा मध्यभागी असतो.

पहा बंजारा समाजाचे नृत्य
https://fb.watch/ijzhGi3668/