⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | महाराष्ट्र | राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा ऐन गणपतीत बेमुदत संपावर जाण्याचा इशारा; ‘या’ आहेत मागण्या

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा ऐन गणपतीत बेमुदत संपावर जाण्याचा इशारा; ‘या’ आहेत मागण्या

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज| १० ऑगस्ट २०२३। राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा बेमुदत संपावर जाण्याची हाक दिली आहे. विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले असून मान्यताप्राप्त संघटनेने प्रलंबित आर्थिक मुद्द्यांच्या सोडवणुकीसाठी ११ सप्टेंबरला संपाची हाक दिली आहे.

जर सरकारने आमचं ऐकलं नाही, तर १३ सप्टेंबरपासून प्रत्येक जिल्ह्यासह प्रत्येक आगारात कर्मचारी काम बंद करून उपोषणाला बसणार, असा इशाराही कामगार संघटनेनं दिला आहे. उद्यापासून या आंदोलनास सुरूवात होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या कोअर कमिटीची आज बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. करारातील तरतुदीनुसार सरकारने ४२ % महागाई भत्ता त्वरीत लागू करावा, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर यांचा फरक त्वरीत अदा करावा, अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे.

याशिवाय मूळ वेतनात जाहीर झालेल्या ५ हजार, ४ हजार तसेच अडीच हजारांमुळे ज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनात निर्माण झालेल्या विसंगती दूर कराव्यात अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे. गणपतीचा सण १९ सप्टेंबरला आहे, त्याआधीच एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने प्रवाशांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला होता. या संपामुळे एसटीची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. त्यातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता पुन्हा बेमुदत उपोषणाचा इशारा देण्यात आल्याने शिंदे सरकारचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी कोणत्या मागण्या केल्या?

  • शासकीय कर्मचाऱ्यांना देय असलेला ४२ टक्के महागाई भत्ता तत्काळ लागू करण्यात यावा.
  • प्रलंबित महागाई भत्ता देण्यात यावा तसेच घरभाडे भत्ता, पगारवाढीतील फरक तत्काळ अदा करण्यात यावा.
  • वरिष्ठ कर्मचाऱ्यांचे घोषित ५ हजार, ४ हजार आणि अडीच हजार रुपयांचे वेतन काढून घ्यावे.
  • शिल्लक रकमेचे वाटप त्वरीत करण्यात यावे.
  • १० वर्षांसाठी ७ वा वेतन आयोग लागू करावा. खासगी गाड्यांऐवजी नवीन खासगी बसेसचा पुरवठा वाढवा.
  • सर्व प्रकारच्या गाड्यांमध्ये विद्यमान कर्मचार्‍यांसह कुटुंबीयांना फॅमिली पास देण्यात यावा.
author avatar
टीम जळगाव लाईव्ह