⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहर | आमदार जिग्नेश मेवाणी यांची सुटका करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे निवेदन

आमदार जिग्नेश मेवाणी यांची सुटका करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे निवेदन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्युज। २७ एप्रिल २०२२ । आमदार जिग्नेश मेवाणी यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली असून ही अटक बेकायदेशीर आहे. लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारी आहे. त्यांची त्वरित सुटका करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

गुजरात मधील वडगावचे काँग्रेस पक्षाचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना आसाम पोलिसांनी गुजरात मधील पालनपुर सर्किट हाऊस येथून तीन दिवसांपूर्वी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास बेकायदेशीरपणे अटक करून त्यांना आसामला घेऊन गेले. आसाममध्ये त्यांच्यावर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून त्यांना पोलिस कोठडीत पाठविण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या नावाने एक ट्विट केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे समजते. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी पंतप्रधानांच्या नावाने काही अपेक्षा करणारे ट्विट करणे हा काही अपराध नाही, लोकशाही व संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहेत. परंतु भारतीय जनता पक्षाच्या सरकारने मनमानीपणे सर्व नियम व कायदे धाब्यावर बसून आमदार मेवानी यांच्यावर ही कारवाई केली आहे. त्यांना त्वरित सोडण्यात यावे असे सदर निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे निवेदनावर अध्यक्ष बाळासाहेब पवार, डॉक्टर उल्हास पाटील, ज्ञानेश्वर महाजन, डी.डी.पाटील, भरत पाटील, किरण पाटील, आशुतोष पवार, जमील शेख, ज्ञानेश्वर कोळी, ज्ञानेश्वर महाजन, के.डी.चौधरी, मनोज सोनवणे यांच्या सह्या आहेत.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.