---Advertisement---
जळगाव जिल्हा

रंगकर्मी शंभू पाटील यांना राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार; खान्देशातील रंगभूमीला पहिल्यांदाच हा पुरस्कार जाहीर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज| ६ऑगस्ट २०२३। पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२३व्या जयंती दिनाचे औचित्य साधून देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य व नाट्य पुरस्कारांची घोषणा पुरस्कार निवड समितीने केली आहे. त्यात पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय नाट्यसेवा पुरस्कार जळगांव येथील रंगकर्मी शंभू पाटील यांना जाहीर करण्यात आला आहे. निवड समितीचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

jalgaon mahanagar palika 43 jpg webp webp

अहमदनगर जिल्ह्यातील लोणी येथे या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. निवड समितीचे निमंत्रक प्रा. डॉ. राजेंद्र सलालकर उपस्थित होते. शंभू पाटील यांच्या सोबत डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत निशिकांत ठकार यांना तर शैलजा बापट, तमाशा कलावंत वसंत अवसरीकर, विश्वास वसेकर यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे. नाट्य सेवा पुरस्कार जाहीर झालेले जळगाव येथील शंभू पाटील यांनी मराठी नाट्य परंपरा जिवंत राहण्यास मदत केली आहे.

---Advertisement---

एल्गार, हा वेडा माणूस शोधतोय, अभिशाप, धर्मसत्य, अपूर्णांक व सध्या गाजत असलेले अमृता, साहिर, इमरोज व नली इत्यादी नाटकांचे लेखनही त्यांनी केले आहे. महाराष्ट्रात व बाहेरील राज्यात अनेक ठिकाणी परिवर्तन कला महोत्सवांच्या निमित्ताने मराठी नाटक समृद्ध केले. साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमात सक्रिय योगदानाचा गौरव म्हणून २५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्काराचे हे ३३वे वर्ष असून, ३० ऑगस्ट रोजी पद्मश्री विखे पाटील यांच्या जयंतीदिनी ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष रवींद्र शोभणे यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार असल्याचे डॉ. रावसाहेब कसबे यांनी सांगितले. खान्देशातील रंगभूमीला पहिल्यांदा हा पुरस्कार जाहीर झाला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---