जळगाव लाईव्ह न्यूज । २८ सप्टेंबर २०२२ । येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ ला.ना. सा.विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक संजय भादूजी वानखेडे यांना या वर्षाचा शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात करीत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे नुकताच राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रमुख अतिथी पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील,जळगांव चे आमदार राजु मामा भोळे,गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकी पाटील,सेवानिवृत्त मेजर सुरेश पाटील,डॉ.प्रभू व्यास, अध्यक्षा संदीपा वाघ आदींच्या हस्ते स्मुर्तीचिंह, प्रशस्तीपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
संजय वानखेडे हे जळगांव येथील नामांकित शेठ. ला.ना. सा.विद्यालयात गेल्या 27 वर्षापासून सेवारत असून ते SET,NET.PET या परीक्षा उत्तीर्ण असून त्यांनी आतापर्यंत शालेय संगणक विभाग,विज्ञान मंडळ,अंधश्रद्धा निर्मूलन समिती,इंटरॲक्ट क्लब,शालेय विधी साक्षरता कक्ष ,प्रसिद्धी विभाग,शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन वर्ग,महाराष्ट्र प्रज्ञा शोध,राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा,टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षा मार्गदर्शन वर्ग,,सांस्कृतिक विभाग,सायन्स ऑलिमपियाड स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, इ.10 वी बोर्ड गणित,विज्ञान विषय परीक्षक व नियामक म्हणून उल्लेखनिय कार्य केले.
जिल्ह्यातील चर्मकार समाजातील विविध सामाजिक संघटनांमध्ये ते विविध पदांवर सक्रिय कार्यरत असून त्यांनी आतापर्यंत अनेक समाजोयोगी उपक्रम.उदा.गुणवंत विद्यार्थी /समाजबांधव सत्कार समारंभ,वधू-वर परिचय मेळावे,संत रविदास महाराज जयंती उत्सव,आरोग्य शिबीर,रोजगार मार्गदर्शन शिबिर,श्री. गणेशोत्सवात विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून विविध समाजोपयोगी उपक्रमाचे आयोजन,समाज एकता मेळावे,समाजातील गरजू,हुशार ,गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वितरण,रोख पारितोषिक वितरण,आदी कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले असून या कार्याची दखल घेऊन राजनंदिनी संस्थेमार्फत त्यांना राज्यस्तरीय आदर्श गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.