⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

Holi Hai : होळी, धुलिवंदनसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर, जाणून घ्या सविस्तर…

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२२ । राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी संकट टळलेले नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने होळी, धुलिवंदनला परवानगी दिली असली तरी नियमावली आखून दिली आहे.

होळी आणि धुलिवंदनासाठी राज्य सरकारनं नवी नियमावली घोषित केली आहे. हे नियम पाळावेच लागणार आहेत अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आदेश गृह मंत्रालयाने दिले आहेत. रात्री दहाच्या आत होळी दहन करावी तसेच डी.जे. लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोना अजूनही पूर्णपणे संपलेला नसल्याने मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या गोष्टींचं पालन करणं गरजेचं आहे. सध्या कोरोनाचं प्रमाण कमी झाल्यानं अनेक निर्बंध शिथिल केले आहेत.

असे आहेत नियम

  • रात्री दहाच्या आत होळी पेटवणं बंधनकारक.
  • डीजे लावण्यास बंदी, डीजे लावल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार.
  • होळी साजरी करताना मद्यपान आणि बीभत्स वर्तन केल्यास कारवाई.
  • महिलांची आणि मुलींची खबरदारी घ्यावी.
  • दहावी आणि बारावीची परीक्षा असल्याने लाऊड स्पीकर जोरात लावू नये, जोरात लावल्यास कारवाई.
  • कोणत्याही जाती, धर्माच्या भावना दुखावतील अशा घोषणा देऊ नये.
  • धुलवडीच्या दिवशी जबरदस्तीने रंग, पाण्याचे फुगे फेकू नये.