⁠ 
रविवार, डिसेंबर 22, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोऱ्याजवळ एस्टी – ट्रकचा अपघात : १३ विद्यार्थ्यांसह २० जखमी

पाचोऱ्याजवळ एस्टी – ट्रकचा अपघात : १३ विद्यार्थ्यांसह २० जखमी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२३ । जळगाव जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. य़ा अपघातात १३ विद्यार्थी बसचालकासह २० जण जखमी झाल्याची माहीती समोर आली आहे. पाचोरा- मोंढाळा रस्त्यावर हा अपघात झाला आहे.

पाचोरा- मोंढाळा रस्त्यावर मौनगिरी साखर कारखान्यासमोर सकाळी सव्वासहा वाजेच्‍या सुमारास हा आपघात झाला. बस व ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला. १३ विद्यार्थी बसचालकासह २० जण जखमी झाल्याची पाथमीक माहीती आहे. (pachora st bus accident)

पाचोरा आगाराची घोसला ते पाचोरा बस प्रवासी व विद्यार्थी घेऊन पाचोऱ्याकडे येत होती. या दरम्‍यान पाचोरा शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर समोरून येणाऱ्या ट्रकवर समोरासमोर धडकली.

मुक्‍कामी असलेल्‍या बसने वाडी, शेवाळे, सातगाव डोंगरी, सातगाव तांडा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने पाचोरा येथे आवागमन करतात. १३ विद्यार्थी व ७ प्रवाशी असे २० प्रवासी या बसमध्ये होते.

बसमधील जखमी विद्यार्थी असे

स्वराज पाटील, विवेक राठोड, गोपाल चव्हाण, नीता राठोड, रोशन परदेशी, सुमित नलवाडे, दीपक पवार, जतीन महाले, पूजा मनगटे प्रतिभा राठोड, रोशनी चव्हाण, ज्योती चव्हाण, पुष्कर पाटील, दिनेश राठोड व दिनेश चव्हाण.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह