⁠ 
गुरूवार, मे 9, 2024

12वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी संधी.. SSC मार्फत नवीन मेगा भरती जाहीर

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या बारावी पास उमेदवारांना मोठी संधी चालून आलीय. कर्मचारी निवड आयोग, SSC ने नवीन मेगा भरती जाहीर केली आहे. स्टेनोग्राफर पदांसाठी ही भरती होणार असून यासाठीची अधिकृत अधिसूचना (SSC Stenographer Recruitment 2022)जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे.

स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि स्टेनोग्राफर ग्रेड डी ची रिक्त पदे केंद्र सरकारच्या मंत्रालये/विभाग/संस्थांमध्ये त्यांच्या संलग्न आणि अधीनस्थ कार्यालयांसह देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत. अर्ज फीबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), अपंग व्यक्ती (PWD) आणि माजी सैनिक (ESM) मधील उमेदवारांना पेमेंटमधून सूट देण्यात आली आहे.

वयो मर्यादा :
वयोमर्यादेबद्दल बोलायचे तर स्टेनोग्राफर ग्रेड सी साठी उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे असावे. आणि कमाल वयोमर्यादा 30 वर्षे ठेवण्यात आली आहे. स्टेनोग्राफर ग्रेड डी साठी, उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे. आणि कमाल वयोमर्यादा 27 वर्षे ठेवण्यात आली आहे. उमेदवारांचे वय 1 जानेवारी 2022 पासून मोजले जाईल.

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून 12 वी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

SSC स्टेनोग्राफर भरती परीक्षा खुली स्पर्धात्मक संगणक आधारित असेल, जी नोव्हेंबर 2022 मध्ये घेतली जाईल. भारत सरकारच्या मंत्रालय/विभाग/संस्थेतील लघुलेखक पदासाठी केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत ज्यांच्याकडे स्टेनोग्राफीचे कौशल्य आहे. रिक्त पदांची माहिती अद्याप देण्यात आलेली नसली तरी आयोग (एसएससी) योग्य वेळी आपल्या वेबसाइटवर रिक्त पदांची माहिती देईल.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा