जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२५ । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल अखेर आज लागला आहे.

वर्षभर विद्यार्थ्यांनी केलेल्या मेहनतीच फळ त्यांना आज मिळेल. शैक्षणिक करिअरमध्ये दहावीच वर्ष महत्त्वाच मानलं जातं. यंदा दहावीचा निकाल 94.10 % टक्के लागला असून या परीक्षेत यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. दहावी परीक्षेत कोकण विभाग अव्वल ठरला आहे. कोकण भागाचा 98.82 टक्के, तर नागपूर सर्वात कमी 90.78 टक्के निकाल लागला आहे.
दहावीचा निकाल कुठे पाहाल?
- https://results.digilocker.gov.in
- https://sscresult.mahahsscboard.in
- http://sscresult.mkcl.org
- https://results.targetpublications.org