SSC Result : महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल घोषित ; यंदाही मुलींचीच बाजी

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२२ । महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९६.९४ इतकी आहे. यात यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 97.96 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 96.06 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा ऑनलाइन निकाल आज दुपारी १ वाजल्यापासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.

राज्यात इयत्ता बारावीनंतर दहावीतही कोकणचा (konkan) निकाल सर्वाधिक निकाल लागला आहे. तर विभागात नाशिकचा (nashik) सर्वात कमी निकाल लागला आहे. या शिवाय राज्यातील 12 हजार 210 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. याशिवाय 66 विषयांपैकी 24 विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच ऑनलाईनच रिझल्ट डाऊनलोड करून घेता येणार आहे.

कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर यंदा दहावीची परीक्षा ऑफलाईन पार पडली. पहिल्यांदा परीक्षा 15 दिवस उशिराने घेण्यात आली. कोरोनामुळे 75 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली. एकूण 66 विषयाकरिता ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे परीक्षेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. इयत्ता बारावीच्या निकालानंतर दहावीच्या परीक्षेत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. त्यानुसार दहावीचा निकाल लागला असून मुलींनीच आपणच अजिंक्य असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

भुसावळ विभागातून धावणाऱ्या १६७ गाड्यांमधून जनरल तिकिटाची सुविधा मिळणार आहे. या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी सर्वसामान्य प्रवाशांना सामान्य तिकीट खिडकीतून तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. तसेच मासिक पासधारकांनाही सुविधा देण्यात आली आहे.