⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | महाराष्ट्र | विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 10वी, 12वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 10वी, 12वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पाहा संपूर्ण वेळापत्रक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२३ । दहावी आणि बारावीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10 वी, 12 वी परिक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बारावीच्या परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च आणि दहावीच्या लेखी परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत होणार आहेत. पाहूया या परिक्षांचे संपूर्ण वेळापत्रक.

याबाबत अधिक माहिती अशी की, १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परिक्षेच्या तारखा महाराष्ट्र राज्य माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये इयत्ता दहावीची परीक्षा गुरुवार 2 मार्च 2023 पासून सुरू होणार आहे. तर 25 मार्च 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. तर बारावीची परिक्षा मंगळवार 21 फेब्रुवारी 2023 पासून ते 21 मार्च 2023 या कालावधीत होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी शिक्षण मंडळाने अधिकृत संकेतस्थळेही जाहीर केली आहेत. शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना तारखा विद्यार्थ्यांना कळवण्यात आल्या आहेत याची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि बनावट वेबसाइटवर शेअर केलेल्या माहितीच्या मागे लागू नका, असा इशारा बोर्डाने विद्यार्थ्यांना दिला आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.