जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । केंद्रीय शासनाच्या नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी खुशखबर आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) दिल्ली पोलिस आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमध्ये उपनिरीक्षक पदाच्या भरतीसाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेतून 4187 पदे ही भरली जाणार आहेत. SSC CPO Bharti 2024
अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ssc.gov.in वर जाऊन अधिकृत अधिसूचना तपासू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. ssc.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 मार्च 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहेत. SSC CPO Recruitment 2024
पदाचे नाव :
1) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (पुरुष) 125
2) दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला) 61
3) CAPF मधील उपनिरीक्षक (GD) 4001
शैक्षणिक पात्रता: अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असावा
वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 20 ते 25 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2024 (11:00 PM)
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online