⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये 4500 जागांसाठी मेगाभरती ; पात्रता फक्त 12 वी पास

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्ही जर 12 वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये आणि मंत्रालयांमध्ये बंपर भरती होणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत संयुक्त उच्च माध्यमिक स्तर परीक्षा 2022 साठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आता जवळ आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख उद्या म्हणजेच 04 जानेवारी 2023 आहे. SSC CHSL Recruitment 2022

एकूण रिक्त पदे : 4500

या पदांवर भरती केली जाणार
SSC CHSL 2022 परीक्षेद्वारे SSC लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC), कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), पोस्टल सहाय्यक, वर्गीकरण सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर (DEO) या पदांसाठी ही भरती होणार आहे.

शैक्षणिक पात्रता :
उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 12 वी (मध्यवर्ती) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

वयाची अट :
वयोमर्यादा किमान १८ वर्षे आणि कमाल २७ वर्षे असावी. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

पगार : Pay Scale |
कनिष्ठ विभाग लिपिक : पे लेवल-2 (19,900-63,200 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर: पे लेवल-4 (25,500-81,100 रुपये) और लेवल-5 (29,200-92,300 रुपये).
डेटा एंट्री ऑपरेटर, ग्रेड ‘A’’: पे लेवल -4 (25,500-81,100 रुपये).

महत्वाच्या तारखा :

ऑनलाइन अर्ज सुरू: 06 डिसेंबर 2022
ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख: 04 जानेवारी 2023
ऑनलाइन फी जमा करण्याची शेवटची तारीख: 05 जानेवारी 2023
ऑफलाइन फी जमा करण्याची शेवटची तारीख: 06 जानेवारी 2023
अर्ज दुरुस्तीची तारीख: 9-10 जानेवारी 2023
ऑनलाइन परीक्षा दिनांक पेपर I : फेब्रुवारी / मार्च 2023

अधिकृत संकेतस्थळ : ssc.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : इथे क्लीक करा