ठरलं तर ! रावेर विधानसभा मतदारसंघातून श्रीराम पाटील अपक्ष लढणार

ऑगस्ट 24, 2023 3:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२३ । उद्योजक श्रीराम पाटील रावेर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढणार असल्याची भूमिका त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. त्यामुळे आता रावेर विधानसभा मतदारसंघातील लढत चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आयोजित पत्रकार परिषदेला गोपाल दर्जी, पिपल्स बँक संचालक सोपान साहेबराव पाटील, विजय गोटीवाले, प्रविण पाचपोहे,मॅक्रो व्हिजन ऍकडमीचे सचिव स्वप्निल पाटील, प्रमोद पाटील, प्रशांत पाटील उपस्थित होते.

shriram patil jpg webp webp

यावेळी श्रीराम पाटील म्हणाले की, आपण पुढची निवडणूक लढणार असून जनतेने रावेर मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मला एक संधी द्यावी तसेच पुढे माझ्या परिवारातुन कोणीही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे प्रत्येक टर्मला नवीन आमदार निवडुन देणारे जनता-जर्नादन येणार्‍या २०२४ ला आपला आशिर्वाद कोणाला देतात याकडे आतापासुनच सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisements

लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र झाल्यास रावेर विधानसभा निवडणूक लढणार आहे. दोन्ही निवडणुका एकत्र न झाल्यास आम्ही संपर्कात असलेल्या पक्षाने उमेदवारी दिली तर रावेर लोकसभा निवडणूक लढवेल उमेदवारी न मिळाल्या शंभर टक्के रावेर विधानसभा निवडणूक आपण अपक्ष लढणार असल्याचे निश्चित केले आहे.

Advertisements

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now