खुशखबर ! दिवाळीत जळगावमार्गे धावणार नागपूर-मुंबई-पुण्यासाठी विशेष गाड्या! थांबे आणि वेळापत्रक पाहा

सप्टेंबर 9, 2025 4:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२५ । भारतात सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. रेल्वेनं आगामी दिवाळी आणि छठ सणांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी” विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये नागपूर ते पुणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते नागपूर दरम्यान विशेष सेवा सुरू करण्यात येत असून या गाड्यांना जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबे असणार असून यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची सोय होणार आहे.

train

नागपूर-पुणे-नागपूर साप्ताहिक विशेष गाडी (20 फेऱ्या)

गाडी क्रमांक 01209 (नागपूर ते पुणे): ही गाडी 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबरपर्यंत दर शनिवारी नागपूरहून रात्री 19:40 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11:25 वाजता पुण्याला पोहोचेल. या गाडीच्या 10 फेऱ्या होतील.

गाडी क्रमांक 01210 (पुणे ते नागपूर): ही गाडी 28 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत दर रविवारी पुण्याहून दुपारी 15:50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06:30 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीच्याही 10 फेऱ्या होतील.
थांबे: उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर-LTT साप्ताहिक विशेष गाडी (20 फेऱ्या)

गाडी क्रमांक 02139 (LTT ते नागपूर): ही सुपरफास्ट विशेष गाडी 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबरपर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबईहून 00:25 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15:30 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीच्या 10 फेऱ्या होतील.

गाडी क्रमांक 02140 (नागपूर ते LTT): ही गाडी 26 सप्टेंबर ते 28 नोव्हेंबरपर्यंत दर शुक्रवारी नागपूरहून दुपारी 13:30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 04:10 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबईला पोहोचेल. या गाडीच्याही 10 फेऱ्या होणार आहेत.
थांबे: ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

आरक्षण कधीपासून सुरू होईल?

पुणे-नागपूर विशेष गाडीसाठी आरक्षण 8 सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस-नागपूर विशेष गाड्यांसाठी आरक्षण आज म्हणजेच 9 सप्टेंबरपासून सुरू होईल. प्रवासी IRCTC च्या वेबसाइट आणि सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवरून तिकीट बुक करू शकतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now