महापरिनिर्वाण दिनानिमित्त जळगाव, भुसावळ मार्गे धावणार विशेष गाड्या; जाणून घ्या रेल्वेचं वेळापत्रक

नोव्हेंबर 30, 2025 10:25 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हजारो आंबेडकरी अनुयायांची येत असतात. अनुयायांची गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेने महापरिनिर्वाण दिनानिमित्त ४ डिसेंबर ते ८ डिसेंबरपर्यंत विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई ते नागपूर आणि मुंबई ते अमरावती दरम्यान अनेक विशेष गाड्या धावणार आहे. विशेष म्हणजे या गाड्यांना भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

train 3 jpg webp

कसं असेल वेळापत्रक?
४ डिसेंबर रोजी सुटणाऱ्या विशेष गाड्या

गाडी क्रमांक 01260 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी नागपूर येथून १८.१५ वाजता सुटेल. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01262, नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी नागपूर येथून २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल.

५ डिसेंबर रोजी सुटणाऱ्या विशेष गाड्या

गाडी क्रमांक 01264 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी नागपूर येथून ०८.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी २३.४५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01266 नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी नागपूर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल.

थांबे: अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जालंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर.

(ब) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर : ४ विशेष रेल्वेगाड्या

६ डिसेंबर रोजी सुटणारी विशेष गाडी

गाडी क्रमांक 01249 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २०.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ११.२० वाजता पोहोचेल.

७ डिसेंबर रोजी सुटणाऱ्या विशेष गाड्या

गाडी क्रमांक 01251- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १०.३० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 01255 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल.

८ रोजी सुटणारी विशेष गाडी

गाडी क्रमांक 01257 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.

दादर – नागपूर : १ विशेष गाडी

७ डिसेंबर रोजी सुटणारी विशेष गाडी

गाडी क्रमांक 01253 दादर – नागपूर विशेष गाडी दादर येथून ००.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल.

थांबे: दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जालंब, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी.

मुंबई – नागपूर विशेष गाड्यांची संरचना:

१६ द्वितीय श्रेणी शयनयान / सामान्य द्वितीय श्रेणी / चेअर कार आणि २ द्वितीय आसनव्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन (एकूण १८ ICF कोच).

अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमरावती : २ विशेष रेल्वे गाड्या

गाडी क्रमांक 01218 विशेष गाडी – अमरावती येथून ०५.१२.२०२५ रोजी १७.४५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०५.२५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक 01217 विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०७.१२.२०२५ रोजी ००.४० वाजता सुटेल आणि अमरावती येथे त्याच दिवशी १२.५० वाजता पोहोचेल.

संरचना:
१६ द्वितीय श्रेणी शयनयान / सामान्य द्वितीय श्रेणी / चेअर कार आणि २ द्वितीय आसनव्यवस्थेसह गार्ड ब्रेक व्हॅन (एकूण १८ ICF कोच)

थांबे: दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर आणि बडनेरा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now