प्रवाशांसाठी खुशखबर ! जळगावमार्गे धावणार नागपूर–मुंबई, पुणेसाठी विशेष गाड्या.. जाणून घ्या वेळापत्रक

फेब्रुवारी 11, 2026 5:41 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव, भुसावळ मार्गे मुंबई, पुणे, नागपूरसाठी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि पुणे येथून नागपूरसाठी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला. रेल्वेत होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून या गाड्यांना जळगाव, भुसावळ स्थानकांवर थांबा असल्यानं जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

train

सीएसएमटी–नागपूर–सीएसएमटी सुपरफास्ट विशेष
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते नागपूर दरम्यान दोन विशेष सेवा चालवण्यात येणार आहेत. २१३९ सुपरफास्ट विशेष गाडी १९ फेब्रुवारी रोजी पहाटे ००.२० वाजता सीएसएमटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता नागपूरला पोहोचेल. तर ०२१४० सुपरफास्ट विशेष गाडी १७ फेब्रुवारी रोजी रात्री ८.०० वाजता नागपूरहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता सीएसएमटीला पोहोचेल.

Advertisements

या स्थानकांवर असेल थांबा?
या गाड्यांना दोन्ही बाजुने दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा, या प्रमुख स्थानकांवर थांबे असतील. गाड्यांची रचना प्रवाशांच्या गरजेनुसार एसी, स्लीपर आणि जनरल डब्यांसह करण्यात आली आहे.

Advertisements

लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर
लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान चार विशेष सेवा देण्यात येणार आहेत. ०१०२१ सुपरफास्ट विशेष गाडी १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी पहाटे ००.५५ वाजता एलटीटीहून सुटून त्याच दिवशी दुपारी ३.४५ वाजता नागपूरला पोहोचेल. तर ०१०२२ विशेष गाडी १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी रात्री ८.०० वाजता नागपूरहून सुटेल. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.४५ वाजता एलटीटीला पोहोचेल.

या गाड्यांना दोन्ही बाजुने ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील. इगतपुरी येथे थांबा फक्त नागपूर–एलटीटी मार्गावरील ०१०२२ गाडीसाठी असणार आहे.

पुणे-नागपूर विशेष गाडी
पुणे आणि नागपूर दरम्यानही विशेष गाड्यांची सोय करण्यात आली आहे. ०१४६७ सुपरफास्ट विशेष गाडी १३ आणि २० फेब्रुवारी रोजी दुपारी ३.५० वाजता पुण्याहून सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. ०१४६८ सुपरफास्ट विशेष गाडी १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.०० वाजता नागपूरहून सुटेल. आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात पोहोचेल. याशिवाय ०१४१९/०१४२० या दोन अतिरिक्त विशेष गाड्या पुणे आणि नागपूर दरम्यान १८ आणि १९ फेब्रुवारी २०२६ रोजी धावणार आहेत.

या सर्व गाड्यांना उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा येथे थांबे असतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now