जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२६ । राजस्थानमधील प्रसिद्ध खाटूश्यामजी येथे दर्शनासाठी जाणाचा प्लॅन करणाऱ्या जळगाव जिल्ह्यासह खान्देशातील भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने काकीनाडा–हिसार–काकीनाडा दरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

जळगाव जिल्ह्यात भुसावळसह जळगाव, धरणगाव आणि अमळनेर स्थानकावर या विशेष रेल्वे गाडीला थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे खाटूश्यामजीच्या दर्शनाला जाणाऱ्या जिल्ह्यासह खान्देशातील भाविकांसाठी ही विशेष गाडी वरदान ठरणार असून, आगामी काळात अशाच आणखी सुविधांची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

गाडी क्रमांक ०७७०५ ही विशेष गाडी १८ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत धावणार आहे. ही गाडी काकीनाडा येथून गुरुवारी सकाळी ५ वाजता सुटेल तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी ही गाडी भुसावळ स्थानकावर सकाळी ७.१५ मिनिटाने तर जळगावला सकाळी ७.५९ मिनिटाने पोहोचेल. यांनतर तिसऱ्या दिवशी शनिवारी रिंगस येथे सकाळी ७ वाजता पोहोचेल व हिसार येथे त्याच दिवशी दुपारी २.०५ मिनिटाने पोहोचेल.

तसेच परतीच्या प्रवासात ०७७०६ ही विशेष गाडी २२ फेब्रुवारी ते २९ मार्च या कालावधीत धावणार आहे. हिसार येथून ही गाडी मंगळवारी रात्री ११.१५ला सुटेल. तर रिंगस येथे दुसऱ्या दिवशी बुधवारी पहाटे ४.४० मिनिटाने पोहोचेल. व जळगाव स्थानकावर तिसऱ्या दिवशी गुरुवारी पहाटे ४.४५ मिनिटाने तर भुसावळला सकाळी ६.२५ वाजता पोहोचेल. यांनतर ती शुक्रवारी सकाळी ९ वाजता काकीनाडा टाउन येथे पोहोचेल.
या स्थानकांवर असेल थांबा
समलकोट जंक्शन, राजमुंद्री, तनुकू, भीमावरम टाउन, अकिविडू, कैकालूर, गुडीवाडा जंक्शन, विजयवाडा जंक्शन, गुंटूर जंक्शन, सत्तेनापल्ले, मिऱ्याला गुडा जंक्शन, नलगोंडा , चारलापल्ली, मेदचल, कामारेड्डी, निजामाबाद जंक्शन, बसर, धर्माबाद, मुदखेड जंक्शन, हजूर साहिब नांदेड, पूर्णा जंक्शन, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला जंक्शन, शेगाव , मलकापूर, भुसावळ जंक्शन, जळगाव जंक्शन, धरणगाव, अमळनेर, नंदुरबार, उधना जंक्शन, वडोदरा जंक्शन, रतलाम जंक्शन, मंदसोर, निमच, चितोडगड जंक्शन, भिलवाडा, विजयनगर, नसीराबाद (जिंशाननगर), अजमेर, किशनगड, नवलगड, झुनझुनुन, चिरावा, लोहारू जंक्शन आणि सादुलपूर जंक्शन.







