जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२५ । जळगावकर रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी एक आहे. गणेशोत्सवानिमित्त जळगावमार्गे एलटीटी ते नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष गाडीच्या सहा फेऱ्या करण्यात येतील. यामुळे मुंबईत श्रींच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची सोय होईल.

गणेशभक्तांच्या सोयीसाठी एलटीटी ते नागपूर दरम्यान अतिरिक्त गणपती विशेषच्या सहा फेऱ्या चालवण्यात येतील. यात ०२१०१ क्रमांकाची गाडी २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत दर शुक्रवारी मध्यरात्री १२.१५ वाजता एलटीटी येथून सुटेल. त्यांनतर ही ट्रेन जळगाव रेल्वे स्थानकावर सकाळी ६ वाजून २६ मिनिटाने तर भुसावळला ६ वाजून ५५ मिनिटाने पोहोचेल. तर नागपूर येथे दुपारी १.४० वाजता पोहोचेल. या गाडीच्या तीन फेऱ्या होतील.

तर ०२१०२ क्रमांकाची विशेष गाडी २२ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत दर शुक्रवारी दुपारी २.३० वाजता नागपूर येथून सुटेल. तर ती भुसावळला रात्री ९ वाजून ४५ मिनिटाने व जळगावला रात्री १० वाजून १८ मिनिटाने पोहोचेल. तसेच ही ट्रेन दुसऱ्या दिवशी पहाटे ०५ वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीच्या सुद्धा तीन फेऱ्या होतील.
या स्थानकांवर असेल थांबा?
या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा थांबा आले







