जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२५ । उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेतला. ही भुसावळ मार्गे धावणार असल्याने भुसावळकर प्रवाशांची सोय झाली आहे.

गाडी क्रमांक ०४२११ लोकमान्य टिळक टर्मिनस ते सुलतानपूर ही विशेष गाडी ६ मे ते २४ जून दरम्यान धावणार आहे. या काळात ही गाडी दर मंगळवारी दुपारी ४.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसहून रवाना होईल. भुसावळला ही गाडी मध्यरात्रीनंतर १२.४५ला येईल तर १२.५० ला रवाना होईल. मुंबई ते सुलतानपूर गाडीच्या आठ फेऱ्या होतील. गाडी क्रमांक ०४२१२ ही गाडी ५ मे ते २३ जूनपर्यंत दर सोमवारी सुलतानपूर स्थानकावरून पहाटे चारला रवाना होईल.
या स्थानकांवर असेल थांबा :
ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, ओराई, कानपुर, लखनौ या स्थानकावर थांबेल.