जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मार्च २०२४ । होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत अनेक जण घरी जाण्यासाठी ट्रेनमध्ये सतत जागा शोधत असतात. जर तुम्हाला अजून कन्फर्म सीट मिळाली नसेल तर काळजी करण्याची गरज नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गाड्यांमधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने 112 होळी स्पेशल ट्रेन्सची घोषणा केली आहे. विशेष यातील 44 रेल्वे गाड्या भुसावळामार्गे धावणार असून या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अशा आहेत स्पेशल ट्रेन
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – बनारस साप्ताहिक विशेष (६ फेऱ्या)
01053 विशेष दि. १३.०३.२०२४, दि. २०.०३.२०२४ आणि दि.२७.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि बनारस येथे दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
01054 विशेष दि. १४.०३.२०२४, दि.२१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी बनारस येथून २०.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर आणि प्रयागराज छिवकी.
संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ९ वातानुकूलित-तृतीय इकॉनॉमी, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणीसह १ गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे).
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – समस्तीपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (4 फेऱ्या)
01043 विशेष दि. २१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि समस्तीपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.१५ वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
01044 विशेष दि. २२.०३.२०२४ आणि दि.२९.०३.२०२४ रोजी समस्तीपूर येथून २३.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०७.४० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, दानापूर, पाटलीपुत्र, हाजीपूर आणि मुझफ्फरपूर.
संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ९ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणीसह १ गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे ).
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – प्रयागराज साप्ताहिक अतिजलद वातानुकूलित विशेष (८ फेऱ्या)
01045 विशेष दि. १२.०३.२०२४, दि. १९.०३.२०२४, दि. २६.०३.२०२४ आणि दि. ०२.०४.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि प्रयागराज येथे दुसऱ्या दिवशी ११.०० वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
01046 विशेष दि. १३.०३.२०२४, दि.२०.०३.२०२४, दि. २७.०३.२०२४ आणि दि. ०३.०४.२०२४ रोजी प्रयागराज येथून १८.५० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १६.०५ वाजता पोहोचेल. (४ फेऱ्या)
थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना आणि माणिकपूर.
संरचना: १ प्रथम वातानुकूलित, ३ द्वितीय वातानुकूलित, १५ तृतीय वातानुकूलित, १ पॅन्ट्री कार आणि २ जनरेटर कार (२२ डब्बे)
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – दानापूर द्वि-साप्ताहिक अतिजलद विशेष (६ फेऱ्या)
01409 विशेष दि.२३.०३.२०२४, दि. २५.०३.२०२४ आणि दि.३०.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी १७.०० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
01410 विशेष दि. २४.०३.२०२४, दि.२६.०३.२०२४ आणि दि. ३१.०३.२०२४ रोजी दानापूर येथून १८.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी २३.५५ वाजता पोहोचेल. (३फेऱ्या)
थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मैहर, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय आणि आरा.
संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ९ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणीसह १ गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे).
पुणे – दानापूर साप्ताहिक अतिजलद विशेष (४ फेर्या)
01105 विशेष गाडी दि. १७.०३.२०२४ आणि दि. २४.०३.२०२४ रोजी पुणे येथून संध्याकाळी १६.१५ वाजता सुटेल आणि दानापूर येथे दुसऱ्या दिवशी २२.०० वाजता पोहोचेल. (२ फेर्या)
01106 विशेष दि. १८.०३.२०२४ आणि दि. २५.०३.२०२४ रोजी दानापूर येथून २३.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे तिसऱ्या दिवशी सायंकाळी ०६.२५ वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
थांबे: दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर (फक्त 01106 साठी), कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, माणिकपूर, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर आणि आरा.
संरचना: १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, ८ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी (२२ डब्बे)
पुणे – कानपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (४ फेऱ्या)
01037 विशेष दि. २०.०३.२०२४ आणि दि.२७.०३.२०२४ रोजी पुणे येथून ०६.३५ वाजता सुटेल आणि कानपूर सेंट्रल येथे दुसऱ्या दिवशी ०७.१० वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
01038 विशेष दि. २१.०३.२०२४ आणि दि. २८.०३.२०२४ रोजी कानपूर सेंट्रल येथून ०८.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १२.०५ वाजता पोहोचेल. (२ फेऱ्या)
थांबे: दौंड कॉर्डलाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी आणि ओराई.
संरचना: १ प्रथम वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, २ तृतीय वातानुकूलित, ५ शयनयान आणि २ गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ८ सामान्य द्वितीय श्रेणी. (१७ डब्बे)
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – गोरखपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (६ फेऱ्या)
01123 विशेष दि. १५.०३.२०१४, दि. २२.०३.२०२४ आणि दि. २९.०३.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १२.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे दुसऱ्या दिवशी १८.५५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
01124 विशेष दि. १६.०३.२०२४, २३.०३.२०२४ आणि दि. ३०.०३.२०२४ रोजी गोरखपूर येथून २१.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ०७.२५ वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा आणि बस्ती.
संरचना: २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, १ गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅनसह ४ सामान्य द्वितीय श्रेणी (२१ डब्बे)
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – गोरखपूर साप्ताहिक अतिजलद विशेष (६ फेर्या)
01103 विशेष दि. १४.०३.२०२४, दि.२१.०३.२०२४ आणि दि.२८.०३.२०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २२.३५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी ०९.३० वाजता पोहोचेल. (३ फेर्या)
01104 विशेष गाडी दि. १६.०३.२०२४, दि. २३.०३.२०२४ आणि दि. ३०.०३.२०२४ रोजी गोरखपूर येथून १५.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे तिसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. (३ फेऱ्या)
थांबे: दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, ओराई, कानपूर सेंट्रल, लखनौ, गोंडा आणि बस्ती.
संरचना: १ प्रथम वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ९ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ३ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणीसह १ गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार (२० डब्बे)