जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑक्टोबर २०२१ । जळगाव महानगरपालिकेची विशेष महासभा दि.१३ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेत मनपाच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समितीमधील निवृत्त झालेल्या सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
जळगाव महापालिकेच्या स्थायी समितीमधील निवृत्त झालेल्या ८ सदस्याच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यासाठी विशेष महासभा बुधवार दि.१३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. याबाबतचे पत्र महापौर जयश्री महाजन यांनी नगरसचिवांकडे पाठविले आहे. निवृत्त झालेल्या ८ सदस्यांच्या नियुक्तीसाठी महापौरांकडून सर्व पक्षांच्या गटनेत्यांना निमंत्रण दिले जाणार आहे. दरम्यान, महिला व बालकल्याण समितीमधील ९ सदस्यही निवृत्त होत असल्याने त्यांच्या जागीही नवीन सदस्यांची नियुक्ती सभेत केली जाणार आले.
महापौरांच्या निर्णयाकडे लक्ष
दरम्यान, सदस्यांच्या नियुक्तीसाठी महापौरांकडून सर्व पक्षांच्या गटनेत्यांना निमंत्रण दिले जाणार आहे, असे असले तरी भाजपाच्या अधिकृत गटनेत्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे महापौर जयश्री महाजन नावे देण्यासाठी भाजपच्या कोणत्या गटनेत्यांच्या नावे निमंत्रण देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.