आजपासून बांद्रा-पटना आणि उधना-भागलपूर दरम्यान धावणार विशेष एक्स्प्रेस, भुसावळला असेल थांबा
जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२४ । सध्या उन्हाळी सुट्ट्या लागल्याने रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होत आहे. गाड्यांमधील गर्दी आटोक्यात आणण्यासाठी रेल्वेकडून विविध मार्गावर विशेष गाड्या चालविल्या जात आहे. यातच आता पश्चिम रेल्वेने आज २९ एप्रिलपासून बांद्रा टमिर्नस ते पटना आणि उधना ते भागलपूर दरम्यान उन्हाळी स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी भुसावळ मार्गे धावणार असल्याने भुसावळकर प्रवाशांची सोय झाली आहे.
०९०७३ क्रमांकाची बांद्रा टमिर्नस ते पटना उन्हाळी विशेष ट्रेन ही आज सोमवारी रात्री ८ वाजून २५ मिनिटाने सुटेल तर दुसऱ्या दिवशी बुधवारी दुपारी १ वाजेला पटना येथे पोहोचेल. ०९०६७ क्रमांकांची उधना – भागलपूर विशेष गाडी आज सोमवारी रात्री ८ वाजेल उधना येथून निघेल तर दुसऱ्या दिवशी बुधवारी भागलपूर येथे दुपारी १ वाजेला पोहोचेल.
या स्थानकांवर राहील थांबा :
गाडी क्र. ०९०७३ बोरीवली, पालघर, बोईसार, वापी, भेस्टन चालठान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई, कानपूर सेंट्रल, प्रयागराज, मिर्झापूर, पं. दीन दयाल उपाध्याय, बक्सर आणि अरा स्टेशन येथे थांबेल.
तर गाडी क्र. ०९०६७ चालठान, बारडोली, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बिना, वीरांगना लक्ष्मीबाई, कानपूर सेंट्रल, प्रयागराज, मिर्झापूर, पं. दीन दयाल उपाध्याय, बक्सर, अरा, पटना, भक्तीयारपूर, मोकामा, किऊल, जमालपूर आणि सुल्तानगंज स्टेशन येथे थांबेल.