जळगाव लाईव्ह न्यूज । गौरी बारी । शरीराने परिपूर्ण असून देखील दैनंदिन जीवनात अनेकांच्या तक्रारी असतात. परंतु असे अनेक लोक आहेत जे शरीराने जरी अपंग असले तरी बुद्धीने परिपूर्ण आहेत. आपण आज या विषयावर का बोलतोय? तर आज आहे जागतिक दिव्यांग दिवस जो जगभरात ३ डिसेंबर रोजी साजरा केला जातो.
सन १९९२ पासून संयुक्त राष्ट्रसंघातर्फे जागतिक दिव्यांग दिन जाहीर केला गेला. हा दिवस अपंग व्यक्तींबाबत सामान्य जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने व त्यांना प्रत्येक वेळेस सहानुभूती नाही तर सामान्य माणसासारखी वागणूक दिली पाहिजे म्हणून जागतिक अपंग दिन हा युनायटेड नेशन्स हे एकत्रित कार्य करून अपंगासाठी जाहीर केला. हा दिवस अपंगासाठी व त्यांच्या कार्य क्षमतेसाठी साजरा केला जातो.
दिव्यांगाच्या हालचालीवर अभ्यास करण्यासाठी १९९२ मध्ये जनरल असेंब्ली ने कार्यक्रम सादर केला होता. संयुक्त राष्ट्रसंघात १९८३ ते १९९२ हे दशक अपंगासाठी अर्पण करण्यात आले होते व त्याद्वारे जगभरच्या सरकारांना अपंगाच्या उद्धारासाठी अनेक मोहीम राबविण्यास भाग पाडले होते. दशक अखेरीस तीन डिसेंबरची निवड झाली होती व १९९२ मध्ये पहिला ‘अपंग दिन’ साजरा झाला होता.
शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून या दिवसाची योजना आहे. दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा तसेच समाजातील अन्य लोकांना प्रेरणा मिळावी म्हणून हा दिवस पाळला जातो.