---Advertisement---
भुसावळ

विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहिम ; प्रा. धीरज पाटील

online application
---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ एप्रिल २०२३ । अनेक वेळेस मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होते ते टाळण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध मोहिमेत सहभागी होण्यासाठी भुसावळातील इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील सर्व मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज भरून देण्याची सुविधा २५ एप्रिलपर्यंत अखिल भारतीय लेवा विकास महासंघातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रा. धीरज पाटील यांनी दिली आहे.

online application

विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मोहीम:
इयत्ता ११ वी व १२ वी विज्ञान शाखेत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी शिक्षण फीची प्रतीपूर्ती करण्याकरिता जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते, तसेच तंत्रनिकेतन अभ्यासक्रमात प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे ऑनलाइन अर्ज भरलेले नाहीत, त्यांनी सर्व मूळ कागदपत्रे अपलोड करून अर्ज भरून घ्यावेत, असे आवाहन प्रा. धीरज पाटील यांनी केले आहे.

---Advertisement---

प्रक्रिया पूर्ण करा:
ऑनलाइन अपलोड केलेला अर्ज व मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती व मूळ शपथपत्र जिल्हा जात पडताळणी समितीच्या नागरी सुविधा केंद्र, येथे कार्यालयीन वेळेत जमा करावेत व प्रक्रिया पूर्ण करावी. अर्जदारांनी अर्ज भरताना स्वतःचा ई-मेल व मोबाइल क्रमांकाद्वारेच अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समितीचा निर्णय किंवा जात वैधता प्रमाणपत्र हे अर्जदाराने नोंदणी केलेल्या ई-मेलवर पाठवत असल्याने अर्जदारांनी आपला यूजर आयडी व पासवर्ड जतन करून ठेवावे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---